जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत समर्थ इंग्लिश स्कूलचे चारही संघ ‘एक नंबरी’ !
चारही संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; बेळगाव ग्रामीण विभागातर्फे होसवंतमुरी येथील केपीएस स्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत उत्तम कामगिरी!
खानापूर: लोकहित न्यूज (क्रीडा)
खानापूर येथील समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल, खानापूर येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन करून शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील उज्ज्वल परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. बेळगाव ग्रामीण विभागातर्फे होसवंतमुरी येथील केपीएस स्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत समर्थ स्कूलच्या चारही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हास्तरीय स्पर्धेत समर्थ स्कूल चारही गटांत प्रथम !
1. १४ वर्षांखालील मुलांचा संघ – प्रथम क्रमांक.
2. १४ वर्षांखालील मुलींचा संघ – प्रथम क्रमांक.
3. १७ वर्षांखालील मुलांचा संघ – प्रथम क्रमांक.
4. १७ वर्षांखालील मुलींचा संघ – प्रथम क्रमांक.
विद्यार्थांचे अथक प्रयत्न कामी आले…
विशेष म्हणजे, चारही संघांनी प्रथम क्रमांक मिळवून आगामी राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले आहे.विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे, क्रीडा शिक्षकांच्या नियोजनाचे तसेच शाळेने क्रीडा क्षेत्राला दिलेल्या प्रोत्साहनाचे फलित आहे.
यांचे मिळाले प्रोत्साहन…
या ऐतिहासिक यशाबद्दल समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, क्रीडा प्रशिक्षक व पालकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
खानापूर तालुक्याच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि गौरवास्पद बाब ठरली आहे.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





