उद्योगराजकीय

जांबोटी भागात भाजपचा ‘पाया’ रोवणाऱ्या ओलमणीच्या ‘साबळे’ घराण्यातील हणमंत साबळें’चा मुलगा zp रिंगणात!!


पेशाने इंजिनिअर असलेल्या तुकाराम साबळेंची मागच्यावेळीपासून होती दावेदारी; मा. आ. कै. प्रल्हाद रेमानी यांच्या काळात साबळे यांनी क्लासवन अभियंते – कंत्राटदार म्हणून परिचित…

 

कारण राजकारण – भाजप 

 

 

जांबोटी::लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

ज्या काळात म. ए समितीच्या वादळासमोर टिकणे मुश्किल होते, जांबोटी पश्चिम भागातील प्रत्येक घरात समितीचाच कार्यकर्ता रक्षकासारखा उभा असतांना, जांबोटीजवळील ओलमणी गावातील साबळे घराणे मात्र , त्याला अपवाद ठरले आहेत, या घराण्यातील ज्ञानेश्वर साबळे साबळे तसेच महादेव साबळे हे दोघे भाऊ तालुक्यात भाजप विस्तारत असतांना, जांबोटी पश्चिम भागात या पक्षाचा पाया रोवणारे पाहिले कार्यकर्ते ठरले आहेत. त्यामुळे त्यांना तालुक्यातील भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये गणले जाते. आता त्यांचेच भाऊ कै. हणमंत साबळे हेही भाजपचेच नेते असून,  पेशाने अभियंता असलेले त्यांचेच मुलगे तुकाराम साबळे यांनी जांबोटी जिल्हा पंचायत उमेदवारी दावेदारी दाखवत आपणही पूर्ण ताकदीने रिंगणात असल्याचे लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले. त्यात त्यांचे भाऊ सचिन साबळे यांनी सध्याचे सक्रिय भाजप भाजप नेते म्हणून कार्यरत असल्याने अधिकच बळ मिळणार आहे, मुळातच अभियंते असणाऱ्या तुकाराम साबळेंच्या दावेदारीने भाजपमधील राजकीय गणिते बदलणार असून, पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

 

माजी आमदार कै. प्रल्हाद रेमानी यांच्या काळात यशस्वी कामकाज…

तुकाराम हणमंत साबळे हे पेशाने इंजिनिअर असुन, सध्या ते गोव्यातील एका नामवंत आयटी कंपनीने मुख्य अभियंते म्हणून कामकाज पाहतात. भाजपचे यशस्वी आमदार कै. प्रल्हाद रेमानी यांच्या काळात जांबोटीत पाण्याची पाईप लाईनचे तर गोल्याळीत पंचायतीची विकासकामे यशस्वी पाहिली आहेत, त्यामुळे त्यांचाही जांबोटी भागात चांगला परिचय आहे. शिवाय ते एक उत्तम समाज सुधारक असून, ओलमणी शाहू हायस्कूलच्या शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष असल्याने दरवर्षी शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम भरवत असतात, त्यामुळे आजूबाजूच्या खेड्यात त्यांची घरोघरी ओळख आहे.

 

जांबोटी भागाचा नकाशा बदलण्याची इच्छा: तुकाराम साबळे 

मुळात उच्च शिक्षित, पेशाने अभियंते (इंजिनियर) असल्याने विकास करून घेण्याची ताकद त्यांच्यात ठासून भरली आहे, त्यात ते सर्व भाषिक असल्याने सरकारदरबारी आवाज उठवू शकतात, असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. मला जांबोटी भागाचा उत्तम असून या भागाचा नकाशा बदलण्याची माझी इच्छा असून, लोकांनी संधी दिल्यास नकीच मी ते करून दाखवेन अशी भूमिका तुकाराम साबळे यांनी लोकहित न्यूज चे संपादक विलास कवठणकर यांच्याकडे दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली.

 

मागच्यावेळीपासून इच्छा असूनही माघार घेतली, आता मात्र , आमची दावेदारी पक्कीच: भाजप युवा नेते सचिन साबळे…

ज्यावर्षी पक्षाने जांबोटी भागात पाय रोवला त्यावेळी आमचे वडील ज्ञानेश्वर साबळे हे एकमेव भाजप कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. याची जुन्या आजी- माजी पक्ष अध्यक्ष, पदाधिकारी आणि तालुका नेत्यांना चांगलीच जाणीव आहे. त्यानंतर आमचे काका हणमंत साबळे हेही भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते राहिले आहेत, मी तर राजकारणात प्रवेश केल्यापासून भाजपचा झेंडा हाती घेतला असून, अनेक निवडणुकांमध्ये कशी?चमक दाखवली याची चांगलीच माहिती जुन्या आणि आताच्या नेत्यांना असेल यात तिळमात्र शंका वाटत नाही. मागच्यावेळीपासून दावेदारीची इच्छा असूनही माघार घेतली आहे, यावेळी मात्र, आमची दावेदारी पक्कीच असल्याचे भाजप युवा नेते सचिन साबळे यांनी स्पष्ट केले आहे.

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *