ओलमणी ; खानापूर पोलिसांची मोठी कारवाई,मारुती पवार यांच्या म्हशी सौंदत्तीकडे सापडल्या!
अवघ्या चारच दिवसांत पोलिसांनी पाच जणांच्या चोरट्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; पण, यातील स्थानिक फितुरांचा शोध कधी?
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
मागच्या आठवड्यात जांबोटी भागातील ओलमणी गावात घडली! येथील सामाजिक कार्यकर्ते तथा काँग्रेसचे युवा नेते मारुती पवार यांच्या गोठ्यातील तीन म्हशी अज्ञातांनी चोरल्या होत्या, याविरोधात मारुती पवार यांनी खानापूर पोलिसात तक्रार दाखल केली, लागलीच पोलिसांनी गतिमान तपास चक्रे फिरवत अवघ्या चारच दिवसांत सदर चोरीचा छडा लावला आहे.बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात सदर तिन्हीं म्हशांचा शोध लावला असून, पाच जणांच्या चोरट्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईबद्दल तक्रारदार आणि खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांतून कौतुक केले जात असून, जिल्हा पोलिस प्रमुखांचेही अभिनंदन केले जात आहे.
कशी घटना घडली…
मागच्या आठवड्यात जांबोटी भागातील ओलमणी गावातील मारुती पवार यांच्या गोठ्यातील तीन म्हशी चोरीला गेल्या होत्या, लागलीच पवार यांनी खानापूर पोलिसात रीतसर तक्रार नोंद करत, ही घटना जिल्हा पोलीस प्रमुखांच्याही निदर्शनास आणून दिली होती. मारुती पवार यांना एआयसीसी सचिव तथा माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर तालुका काँग्रेस नेते सुरेश जाधव, युवा नेते दीपक कवठणकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. पोलिसात तक्रार केल्यानंतर संशयितांचे दूरध्वनी क्रमांकही पोलिसांना देण्यात आले होते, त्यामुळे शोधकार्याला मोठी गती मिळाली.
पण, स्थानिक फितुराचा शोध कधी?
कोणत्याही घटनेला घरच्या भेदी कारणीभूत असतो या म्हणीप्रमाणे स्थानिक सहभागाशिवाय ही चोरीची घटना घडूच शकत नाही. स्थानिकांनी बाहेरच्यांना माहिती दिल्यानंतरच चोरीचा प्रकार घडला आहे ,यात तिळमात्र शंका नाही! त्यामुळे कोण ते स्थानिक चोरी फितूर यांचाही पोलिसांनी उलगडा करावा, जेणेकरून यापुढे अशा घटना कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा तक्रारदार आणि स्थानिक शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे.

संपादक : विलास गोविंद कवठणकर




