तीन कोटींतून होणार नंदगड- नागरगाळी रस्त्याचा विकास!
नवीन रस्त्यामुळे प्रवास होणार जवळचा: बुधवारी आमदारांच्याहस्ते भूमिपूजन…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या नवीन रस्त्यांचा सपाटा सुरूच असून, नंदगड ते नगरगाळी रस्ता विकासासाठी 3 कोटींचा निधी त्यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून, आज (दि.28) त्याचे भूमिपूजन आमदारांच्याहस्ते करण्यात आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर आमदारांनी संबंधित कंत्राटदाराला उउत्कृष्ट कामकाज करण्याची ताकीद दिली.
यावेळी तालुका भाजप अध्यक्ष बसवराज सानिकोप, भाजप नेते बाबाराव देसाई, तालुका भाजप प्रधान सचिव मल्लापा मारिहाळ, भाजप नेत्या रविना पठाण, महिला मोर्चा उपाध्यक्ष सुनीता परिश्ववाडकर, भाजप नेते प्रभू देसाई, किशोर हेब्बाळकर, जोतिबा सुतार, मनोहर कदम, रवी पाटील धनश्री सरदेसाई आदी मान्यवर व गावकरी उपस्थित होते.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





