उद्योगसामाजिक

अंकले भूतनाथ मंदिराच्या तिजोरीत 5 लाखांची भर


विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा यांच्या फंडातून; काँग्रेस युवा नेते इरफान तालीकोटी यांचे अथक प्रयत्न, गावकऱ्यातून समाधान…

 

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

अन होणी को, होणी में बदलदेंगे, म्हणत तालुक्याच्या सामाजिक मैदानात उतरलेल्या तालुका अंजुमन इंडियाचे अध्यक्ष तथा तालुका युवा काँग्रेस नेते इरफान तालीकोटी यांच्या प्रयत्नातून विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा फंडातून अंकले येथील श्री भूतनाथ देवस्थानच्या विविध विकासाठी 5 लाखांचा निधी उपलब्ध झाला असून, त्यातून मंदिराची सुधारणा करण्यास मदत होणार आहे.

 

विजसेवा, मंदिर सुशोभिकरण होणार…

मंजूर झालेल्या 5 लाखांच्या निधीतून मंदिरापर्यंत विद्युत खांब बसवणे, त्यावरून विजसेवा जोडून देणे, तसेच मंदिरच्या इतर सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे मंदिराची अधिक प्रसिध्दी वाढणार असून, भाविकांची संख्याही प्रचंड होईल.

 

गावकऱ्यांची मागणी पूर्ण केली: इरफान तालीकोटी 

अनेक दिवसांपासून अंकले गावकऱ्यांची माझ्याकडे मागणी होती की, आम्हांला विद्युत पुरवठा करून द्या, तसेच मंदिर सुधारणेसाठी निधीही उपलब्ध करून देण्यासाठी गावकरी आग्रही होते. नुकतेच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची गावकऱ्यांसमेवत भेट घेऊन तशी मागणी केली. लागलीच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी सदर मागणीचा विचार करत 5 लाखांचा चेक दिला. यावेळी माझ्या समवेत श्री भूतनाथ आणि ब्रम्हलिंग ट्रस्ट कमिटी  मारुती नानू निडगलकर , मल्हारी नारायण सावंत, यल्लापा लक्ष्मण होसुरकर, नागेंद्र ईश्वर होसुरकर, गणपती गुंडू कुळम, नामदेव ईश्वर चोपडे सदोबा रामू गोरल,  बुधाप्पा विठोबा मोटर, जोतिबा निंगाप्पा गुरव,  संतोष तुकाराम सावंत, सातेरी मारुती चोपडे, भैरू रावलू गवाडे आदी उपस्थित होते…

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *