वाटरमन की, हैवान? ; शुल्लक कारणावरून बेदम मारहाण कितपत योग्य?
आता ग्रामीण भाग बनला शहरांपेक्षा डेंजरझोन; जुन्या नव्या रागाने वाढती दुस्मनी वाढता वाढे! पोलिसांनी दखल घेण्याची गरज!
इंदहोंड : लोकहित न्यूज (क्राईम स्टोरी)
शुल्लक कारण, बेदम मारहाण! तीही गुप्त अंगावर, बर घटनास्थळीच काहीं तरी वाईट बरे झाले असते तर? पुढे काय झाले असते! तेही गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांकडून जणू हैवानीयतचे प्रदर्शन! कितपत योग्य? ! असेल जुनी -नवी कारणे, दुश्मनी! तो नंतरचा विषय! पण, वॉटरमन आणि त्यांच्या मुलाने मिळून एकट्याला बेदम मारहाण करणे साफ चुकीचे! पोलिसांनी याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
ग्रामीण भाग बनला शहरांपेक्षा डेंजरझोन; ग्राम पंचायतीची काय भूमिका?
अलिकडच्या ग्रामीण भागात काळात वाढत्या राजकारण ईर्ष्या, राजकारणी सपोट, एकमेकाचे पाय ओढणे, ताकद, पैसा आणि पदाचा गैरवापर करणे, असे प्रकार वाढीस गेले आहेत. मी कसेही वागलो तरी आमचा साहेब आहे सावरायला, सोडवायला! ही मानसिकता वाढली आहे. एक राग मनात धरून, त्याचा बदला घेणारच अशी गुन्हेगारी वागणूक सर्वत्र पहायला मिळते! शेवटी त्यातून काय साध्य केले, एकमेकाचे वाईट, इतकेच ना! पुढे काय? असे प्रकार असेच सुरू राहिले तर कसा टिकणार गावचा एकोपा आणि सलोखा! त्याच गावात एखाद्याचे वाईट -बरे झाल्यानंतर लगेच धावून जाणारी माणुसकी हैवानीयत बनू लागले आहे का? या प्रश्नाचे उत्तर हो असेच येईल! नागरिकहो तीस वर्षांपूर्वीचे दिवस आठवा, त्याकाळी तुम्हीचं किती आनंदात होता, मग तुम्हांला आताच काय झाले, पदाचा माज, पैशाची गुर्मी की, साहेबाचा पाठिंबा? ! हे सर्वच व्यर्थ आहे. कारण शेवटी उरते ती एकच ऊर्जा ती म्हणजे माणुसकी? त्याचे थोडे तरी सर्वांनी भान ठेवणे गरजेचे आहे.
काय आहे ही घटना; पोलिसांची काय भूमिका , ग्राम पंचायत काय करणार? !
इंदहोंड ( ता. खानापूर) येथे घडलेली ही घटना, सागर परशुराम कुंभार (रा. शिंगीनकोप (ता. खानापूर) हा तरुण आपली ट्रॅक घेऊन रस्त्याने जात होता, त्याच दरम्यान ईदलहोंड ग्राम पंचायतीचा वॉटरमन त्याच रस्त्याने जात होता, ट्रकमधून आलेली धूळ अंगावर शिडवली म्हणून वॉटरमन आणि त्यांच्या मुलाने मिळून सागर याला लाठ्या बुक्यांनी मारहाण केली, त्यामध्ये सागरच्या गुप्तांगावरही जबर मार लागल्याने त्याला तातडीने बेळगांव सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जुन्या रागातून ही मारहाण झाली असून, घातपात करण्याचा प्रयत्न होता की, काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधितांवर पोलिस कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





