उद्योगराजकीय

काँग्रेस लागली कामाला! इच्छुकांची चाचपणी!


आता खरी रंगत रंगणार; तालुक्याचे राजकारण निघणार ढवळून…

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

दोन दिवसांपूर्वी सरकारने झेडपी आणि टीपीचे आरक्षण जाहीर करताच, खानापूर तालुक्यात राजकीय वारे वाहू लागले आहे. भाजप आणि समितीच्या आधी नंबर मिळवत, तालुका काँग्रेसकडून zp, TP साठी चाचपणी सुरू झाली असून, इच्छुकांनी तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांकडे अर्ज करण्याचे आवाहन तालुका काँग्रेसने केले आहे. एआयसीसी सचिव तथा माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार ही कार्यवाही सुरू झाली आहे .

 

असे करायचे आहेत अर्ज…

कोणत्या जिल्हा व तालुका पंचायत मतदार संघातून निवडणूक लढवायची आहे, इच्छुकांचा पत्ता, आधार कार्ड अर्थात आपला कागदोपत्री परिचय द्यायचा आहे. येत्या आठ दिवसात इच्छुकांनी अर्ज करावा अशी सूचना माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांनी केली आहे.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *