उद्या ( गुरूवार दि.26 ) बेळगांव वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 77 व्या संविधान अर्पण दिनाचे आयोजन…
जिल्हा अध्यक्ष राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्थानक ते आंबेडकर गार्डन पर्यंत रॅलीचे आयोजन…
बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
याच महिन्यात 26 तारखेला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तात्कालीन देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हाती आपल्या देशाचे लिखित संविधान अर्पण केले होते, तोच हा सोनियाचा दिवस आहे याला आज 77 वर्षे पूर्ण झाली असून, याच दिनाचे औचित्य साधून जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधान अर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानिमित्त बेळगांव रेल्वे स्थानक ते आंबेडकर गार्डन पर्यंत बाईक रॅली काढून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राजू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, नागरिकांनी या यावेळी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे राजू कांबळे यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना केले आहे..

संपादक : विलास गोविंद कवठणकर





