सत्ताधाऱ्यांची 5 जागांवर बिनविरोध ‘पकड’ , बिनकर्जदारा’साठी मोठे ‘राजकारण ‘ होणार!
एकूण 23 अर्ज दाखल, 23 तारखेला माघारी; कर्जदार – बिनकर्जदारसाठी तब्बल 20 अर्ज, बिन कर्जदारसाठी पाटील गटातून दोन तर कसर्लेकर गटातून एकमेव अर्ज….
आमटे: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आमटे कृषी पत्तीनच्या 12 जागांसाठी आज ( शनिवार दि.21) तब्बल 23 अर्ज दाखल झाले आहेत, सत्ताधारी लक्ष्मण कसर्लेकर गटाच्या बाजूच्या महिला- 2, ब- वर्ग -1, अ’ वर्ग – 1, एसटी – 1 अशा एकूण 5 जागा बिन विरोध झाल्यात जमा आहेत. कर्जदार आणि बिन कर्जदारसाठी एकूण 20 अर्ज आले आहेत, त्यामध्ये कर्जदारसाठी सत्ताधारी गटातून एक तर विरोधी गटातून एकमेव अर्ज दाखल झाला आहे, तर कर्जदारसाठी एकूण 17 अर्ज दोन्हीं बाजूने आले आहेत. त्यामुळे बिनकर्जदारसाठी होणार आहे, यामध्ये माजी आमदार अरविंद पाटील आणि विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर या दोघा जुन्या मित्रात मोठे ‘राजकारण रंगणार’ यात तिळमात्र शंका नाही!
जरी बिनकर्जदारसाठी निवडणूक ईर्ष्येची असली तरी, आजच बिन विरोध झालेल्या 5 जागा सत्ताधाऱ्यांसाठी विजयाची नांदी ठरू शकते!
जरी बिनकर्जदारसाठी निवडणूक झाली तरी आजच बिन विरोध झालेल्या 5 जागा सत्ताधाऱ्यांसाठी विजयाची नांदी ठरू शकतात, त्यामुळे उरलेल्या कर्जदार आणि बिनकर्जदारसाठी होणारी निवडणूक कोणाच्या पत्त्यावर पडणार हे पाहावे लागेल!
बिनकर्जदार विरोधी तर कर्जदाराठी सत्ताधारी एक पाऊल पुढे!
काहीही असले तरी दोन्हीं गटांची बिनकर्जदार’वरच अधिक नजर असेल, पण असे असले तरी, बिनकर्जदारसाठी होणारी अधिक मते ही कोर्टात अडकली आहेत, त्यामुळे ती कोण आणणार त्याची बाजू भक्कम असेल असे या जागेचे चित्र आहे. याबाबतीत विरोधी अरविंद पाटील गटाचे एक पाऊल पुढे असेल, तर कर्जदारसाठी विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांची बाजू भर भक्कम मानली जात आहे. त्यामुळे ‘पाटील’ यांनी यावेळी खेळली तरच त्यांच्या हाती काही तरी लागू शकेल का? हा चिंतनाचा विषय असेल. म्हणजे काय फोडाफोडीसारखे मार्ग झाले तर थोडे फार हिकडे – तिकडे होईल का? असे म्हटले तरी हेही सत्ताधाऱ्यांच्या अधीन असलेल्या मतदारांवर सर्वकाही अवलंबून असेल का? हीही शक्यता जर – तरच्या ‘तराजूत ‘ असेल, त्यामुळे 23 तारखेच्या अर्ज माघारीनंतर खूप काहीं बदल राजकीय चित्र दिसून येईल…

संपादक : विलास गोविंद कवठणकर





