देवाचीहट्टीत बनले ‘ईडन गार्डन ‘ मैदान! आज पार पडले दिमाखात उद्घघाटन !
तात्कालीन ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, पत्रकार विलास कवठणकर , माजी सैनिक रमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गावच्या युवकांच्या खंबीर पाठिंब्यामुळे साकार झाले सुंदर ग्राउंड; मान्यवरांची उपस्थिती
देवाचीहट्टी::लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
आजकाल शिक्षणाबरोबर खेळही महत्त्वाचा घटक बनला आहे , याआधी फक्त शहरातून खेळांचे फॅड दिसत होते, शिवाय तेथूनच राज्य आणि राष्ट्रीय लेवलचे खेळाडू तयार व्हायचे. पण, आजच्या घडीला तो काळ खूप मागे राहिला असून, त्याउलट चित्र निर्माण झाले आहे. त्याचेच जिवंत उदाहरण म्हणून आकाराने छोटे पण, विकासाने मोठे अशी ख्याती असलेल्या देवाचीहट्टी (ता. खानापूर) गावात तात्कालीन ग्राम पंचायत सदस्य प्रदीप कवठणकर, गावचे पत्रकार विलास कवठणकर तसेच उत्तम देशसेवा बजावून आलेल्या माजी सैनिक तथा आयकॉन क्रिकेट प्लेअर रमेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गावच्या सर्व युवकांच्या खंबीर पाठिंब्यामुळे जणू कोलकत्याचे ईडन गार्डन मैदान बनले आहे. आज मान्यवरांच्याहस्ते या मैदानाचे दिमाखात उद्घघाटन करण्यात आले. त्यामुळे भविष्यातील खेळाडूंसाठी ही एक मेजवानी आणि आपली खेळाडूवृत्ती दाखवण्यासाठी उत्तम संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या मैदानात राज्य आणि देशपातळीवरील खेळाडू तयार होणे ही एक सुवर्ण संधीच बनली आहे. त्याचा पुरेपूर फायदा गावच्या युवकांसह आजूबाजूच्या खेळाडूंनी उठवावा अशीच अपेक्षा यावेळी उपस्थित मान्यवरांतून व्यक्त करण्यात आली.
महनीय मान्यवरांची उपस्थिती; युवकांना प्रेरणादायी…
यावेळी तोराळी सी आरपीएफ कॅम्पमचे डीआयजी बिनोद टोपो, त्यांचे डीसी, कमांडंट, लैला शुगर्स एमडी तथा जिल्हा रयत मोर्चाचे उपाध्यक्ष सदानंद पाटील, माजी भाजप प्रधान मंत्री मारूती पाटील, जांबोटी भाजप युवा नेते दौलत कोलीकर, भाजप युवा नेते पवन गायकवाड, श्रीराम सेनेचे तालुका अध्यक्ष, तालुका भाजप युवा नेते पंडित ओगले, जांबोटी हिंदुत्ववादी नेते तथा कुस्मळीचे धगधगते युवा नेतृत्व अनंत सावंत, तालुका काँग्रेस नेते दीपक कवठणकर, बैलुर कृषी पत्तीनचे अध्यक्ष तथा क्रिकेट आयकॉन प्लेअर दामोदर नाकाडी, ओलमनीचे भाजप युवा नेते सचिन साबळे, नारायण स्वामी, शंकर गावडे, प्रभाकर शेंगाळे, गोविंद गावडे, मारूती कुंभार, महादेव केरीकर, तुकाराम कवठणकर, निंगाप्पा पाटील, माजी आमटे ग्राम पंचायत अध्यक्षा निकिता गोंडे, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, तोराळीचे माजी ग्राम पंचायत सदस्य पुंडलिक पाटील, गोविंद पाटील, श्रीपाद उशीनकर, लक्ष्मण कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी गावचे ज्येष्ठ नागरिक मोतीराम गावडे होते, मास्तर सागर कांबळे यांनी स्वागत केले. राकेश कांबळे यांनी आभार मानले.
मैदानाचे नाव ‘हेळेदेव ‘ ; मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण!
आजूबाजूच्या खेड्यांमध्ये उत्तम अशा सुसज्ज बनलेल्या ग्राऊंडचे नाव हेळेदेव असे देण्यात आले, असून लैला शुगर्सचे एमडी सदानंद पाटील, डीआयजी बिनोद टोपो, हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले, अनंत सावंत, दौलत कोलीकर, सचिन साबळे, पवन गायकवाड, प्रदीप कवठणकर, शंकर गावडे, धनश्री सरदेसाई यांच्याहस्ते हेळेदेव मैदान नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
युवकांनो या मैदानाचा पुरेपूर फायदा करून घ्या; मान्यवरांचे विचार…
आजूबाजूच्या खेड्यातच हे मौदान सुंदर ग्राउंड म्हणून ओळखले जाईल, अफाट मोठे आणि सपाट असलेल्या या ग्राऊंडवर मोठमोठे खेळाडू घडण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे गावच्या व आजूबाजूच्या खेळाडूंनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले.
पाच हिरकणीं’चा गौरव!
कुस्तीमध्ये राज्यस्तरीय प्राविण्य मिळवलेल्या श्रावणी भरमानी पाटील, समीक्षा श्रीपाद उशीनकर, बेळवट्टीच्या तीन प्राविण्य महिला खेळाडूंचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.

संपादक : विलास गोविंद कवठणकर





