ओलमणीतील एनएमआर कुणाच्या घशात? ; जांबोटी पंचायतीचा ‘कारभार’ असा – कसा?
कामगारांची फाटाफूट करत,अर्ध्यांचे पूर्ण तर अर्ध्यांचे कमी मानधन काढले, इंजिनियर आणि पीडीओंच्या मनमानीचा आरोप; व्ही रामजी योजनेचे मुख्यस्यथ यल्लाप्पा अण्णा , आणि नागेश कांबळे यांचे तालुका पंचायतीसमोर आंदोलन सुरू….
जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
जांबोटी पश्चिम भागातील केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी पंचायतीचा आंधळा कारभार उघड्यावर पडला आहे, देशातच नव्याने सुरू झालेल्या व्ही रामजी ( आधीच्या नारेगा) योजनेच्या कामावरून सर्वत्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच नुकताच एक अजब प्रकार याच पंचायतीच्या ओलमणी गावात उघडकीस आला आहे, याठिकाणी एकत्र राहणाऱ्या कामगारांची फाटाफूट करून, अर्ध्यांचे पूर्ण तर अर्ध्यांचे कमी मानधन काढण्याचा प्रकार समोर आला आहे, नंदगड येथील व्ही जी रामजी योजनेचे मुख्यस्थ यालाप्पा अण्णा यांनी हा प्रकार उघडकीस आणला असून, कट केलेले अर्धे मानधन गेले कुणाच्या घशात ? पीडीओंच्या की, इंजिनीअरच्या? असा गंभीर आरोप करत, यालाप्पा अण्णा आणि ओलमणीचे समाजसेवक नागेश कांबळे यांनी या कारभाराच्या निषेधार्थ खानापूर तालुका पंचायतीसमोर आज रात्री आंदोलन छेडले आहे.
जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करणारच!
काही कामगारांचा पगार पूर्ण तर अर्ध्यांचे कमी मानधन काढल्याने आम्हीं या प्रकाराबद्दल सबंधित पीडीओ आनंद भिंगे व अभियंत्यांना विचारले असता, त्यांच्याकडून आम्हाला थातूर-मातुर उत्तरे मिळावी, त्यामुळे आम्हीं तालुका पंचायत इओ यांच्याकडे तक्रार केली, त्यांनीही दखल न घेतल्याने आम्हीं हे आंदोलन छेडले आहे, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचे यालाप्पा अण्णा यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना सांगितले.. तसेच या प्रकरणाची जिल्हा पंचायतकडून चौकशी व्हावी अशी आमची मागणी असल्याचेही ते म्हणाले…

संपादक : विलास गोविंद कवठणकर





