उद्योगराजकीय

Zp निवडणूक: भैरू पाटील यांच्यामुळे काँग्रेसला ‘बहर’ ? ; जांबोटीसाठी आघाडीवर!


अभियंता उच्च शिक्षित पदवी प्रदान; प्रेश चेहरा काँग्रेसकडून संधी मिळणार का?…

 

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

राज्यात  सरकार असल्याने डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीत चांगले दिवस येण्याची चिन्हें दिसत आहेत, त्यामुळे कधी नव्हते तेवढे ढीगभर उमेदवार राज्यात ठिकठिकाणी उभे राहण्याच्या तयारीत आहेत. त्याप्रमाणे यावेळी जांबोटी जिल्हा पंचायतीसाठी काँग्रेसकडून नवनवे उमदेवार तयार होऊ लागले आहेत, नुकतेच काँग्रेसवाशी झालेले कौलापूरवाडा (तीर्थकुंड्ये) येथील उच्च शिक्षित अभियंते असलेले भैरू वाघू पाटील यांनीही आपल्या उमेदवारीची तयारी दर्शविली आहे, त्यामुळे आणखी एक नवीन फ्रेश चेहऱ्याची भर जांबोटी जिल्हा पंचायतीच्या रणांगणात पडली आहे.

 

शैक्षणिक आणि सहकार खात्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व! 

मुळात स्वतः हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन अभियंते पदवीपर्यंत मजल मारलेल्या भैरू पाटील हे शिक्षण प्रेमी म्हणून ओळखले जातात, त्यांनी आपल्या प्रयत्नातून अनेक शाळांच्या होतकरू आणि गरीब विद्यार्थांना पुस्तके, वह्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करत, दिलासा दिला आहे. तसेच ते सहकार खात्यातील अभ्यासू व्यक्ती असल्याने, त्यांना विविध को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये संचालक म्हणून कार्यरत आहेत.

 

जांबोटी सोसायटीचे संचालक, पिरणवाडी येथील शाखेचे मुख्यस्त!

जांबोटी पश्चिम भागातील नामवंत सोसायटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जांबोटी को ऑपरेटिव्ह सोसायटीचे ते संचालक म्हणून भार सांभाळत आहेत, तसेच पिरनवाडी येथील एका सोसायटीचे मुख्यस्त आहेत, त्याही माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, अनेक लोकसमूहाच्या प्रवाहाबरोबर त्यांचे जवळचे नाते आहे. त्यामुळे त्यांचा चांगलाच लोक संपर्क आहे. गेल्या 12 वर्षांपासून सामाजिक कार्यात सहभागी असलेले सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

 

पक्षाकडून उमेदवारी मिळणार असल्याचा त्यांना ठाम विश्वास!

पक्षाकडून मलाच उमेदवारी मिळणार असल्याचा विश्वास भैरू पाटील यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना व्यक्त केला. मला उमेदवारी मिळाल्यास नक्कीच मी विजयापर्यंत पोहचू शकेन असेही ते पुढे बोलतांना म्हणाले.

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *