पक्षातील शांतता राखणारे ‘दिव्य संजय ‘
जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल यांचा आज वाढदिवस; राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव होणार, अभिनंदनाच्या कार्यक्रमाचे आयोजन, पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचा जनसागर लोटणार…
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
नेता , प्रवक्ता, पक्षाचा तारणहार, कट्टर हिंदुत्व आणि प्रामाणिक पक्षनिष्ठा, सामन्यांतून मिळून- मिसळून हे सर्व गुण ज्यांच्यामध्ये असतात त्यांनाच सच्चा नेता आणि समाजसेवक म्हणून ओळखले जाते. ते सर्व गुण जिल्हा भाजप उपाध्यक्ष, माजी तालुका अध्यक्ष, समृध्दी सोसायटीचे संस्थापक ,मराठा नेते संजय कुबल यांच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच आजचा वाढदिवस! त्यानिमित्त नुसतीच गर्दी खेचणे हा त्याचा उद्देश नसून, आपल्या माणसांशी असलेला स्नेह संबंध अधिक दृढ करणे हा आहे. सध्या तालुका भाजपमध्ये दिसणारे तीन रस्ते अर्थात तीन गट थोपवण्याची महाभारतातील ‘दिव्य दृष्टी’ असलेल्या संजय’ची भूमिका घेणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यापूर्वी ते तालुका अध्यक्ष म्हणून राहिलेले असल्यामुळे पक्षाच्या समन्वयाची उत्तम कामगिरी पार पाडू शकतात अशी, भाबडी धारणा नेते आणि कार्यर्त्यांतून दिसू लागली आहे.
सामान्यांचा आवाज….
जिथे सामान्यांवर अन्याय तिथे संजय कुबल यांचा आवाज आला नाही असे शक्यच नाही. तालुक्यातील अनेक लहान -मोठ्या आंदोलन मोर्चाचे नेतृत्व त्यांनी तितक्याच चतुराईने पार पाडले आहे. त्यामुळे पक्ष असो वा तालुक्यातील इतर सामन्यांच्या अडचणी, समस्यांसाठी नेहमी पुढे धावणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
भाजपाचा बुलंद आवाज…
तालुका भाजप पक्षाचा आवाज दूरवर पोहचण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे, त्यांच्या बुलंद आणि अभ्यासू आवाजाने पक्षाचा आवाका आणि प्रसिध्दी वाढली आहे. तालुका आणि जिल्ह्यात हिंदू वक्ता म्हणून त्यांची गणना होते.
गल्ली ते दिल्लीपर्यंत संजय भाऊंचा आवाज…
गल्ली ते तालुका स्तरावर अनेक वर्षे भाजप पक्षाचे काम करत कार्यकर्ता ते प्रमुख नेत्यांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे, त्यासाठी त्यांना अनेक वादळांचा सामना करावा लागला आहे. आज गल्ली ते दिल्लीपर्यंत संजय भाऊंचा आवाज ऐकला जातो. केंद्रीय मंत्री, खासदार प्रमुख नेत्यांशी चांगलीच जवळीक आहे. त्यामुळे कोणतेही काम ते झटकीपट करून देण्यास ते चांगलेच माहीर आहेत.
राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव; खानापुरात आज अभिनंदनाचा भव्य कार्यक्रम…
भाजप नेते संजय कुबल यांना राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे, मंत्री, खासदार,आमदार भाजपचे वरिष्ठ नेते, तालुक्यातील कार्यकर्ते आणि त्याच्या हितचिकांकडून अभिनंदन सुरू आहे. खानापुरात आज अभिनंदनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, सर्व कार्यकर्ते नेते आणि हितचिंतकांना आमंत्रित करण्यात आले आहे..

संपादक : विलास गोविंद कवठणकर





