आमटे कृषी पत्तीन निवडणूक – लक्ष्मणाचा ‘बाण’ पेलणार कोण?
29 नोव्हेंबरला निवडणूक; 15 ला अर्ज भरणा, 23 ला माघार, 29 ला सायंकाळपर्यंत निकाल…
आमटे/ खानापूर लोकहित न्यूज (कृष्णा भरणकर)
काहीं वर्षांपूर्वी माजी आमदार अरविंद पाटील आणि आमटे पंचायतीचे माजी अध्यक्ष तसेच विद्यमान आमटे कृषी पत्तीनचे अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांची राम – लक्ष्मणांची जोडा होती, अलीकडच्या काळात म्हणजेच गेल्या आमटे कृषी पत्तीन निवडणुकीपासून यांच्यात कधी नीट असते तर कधी राजकीय सोयीनुसार गुप्तगू होत राहते पण, यावेळी काहीं सभासदांना मतदानाचे हक्क मिळण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक तथा माजी आमदार अरविंद पाटील यांनी एका सभासदाला पुढे करून धारवाड हायकोर्टात धाव घेतली होती, काहीं दिवस चालली ही केस! यात अरविंद पाटील यांनी बाजी मारणार का? असे चित्र दिसत असतांनाच, कोर्टातील किडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लक्ष्मण कसर्लेकर यांनी ऐन वेळेस बाजी युक्तिवाद करून सदर केस जिंकली. त्याच दिवशी या कृषी पत्तीन संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. नुकतेच सहकार खात्याकडून निवडणुकीची तारीख जाहीर झाली असून, 29 नोव्हेंबरला ही होणार आहे, 15 नोव्हेंबरला अर्ज भरायचा आहे, 23 ला माघार घ्यायची आहे, तर निवडणुकीच्या दिवशी सायंकाळीच निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
लक्ष्मण कसर्लेकर यांची बाजू भक्कम; लक्ष्मणा’चा ‘ बाण ‘ पेलणार कोण?
धारवाड हायकोर्ट निकालानंतर विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांची बाजू भक्कम दिसत आहे, त्यामुळे त्याचा विजयरथ कोण रोखणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे, सध्या असलेल्या सभासदांमध्ये जवळपास सर्वच सभासद कसर्लेकर यांच्या हातातील आहेत, त्यात अर्धे विरोधी असतील पण, ते विजयापर्यंत पोहचू शकतील असे वाटत नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत विरोधींना लय सापडणे खूपच कठीण आहे. त्यामुळे ही निवडणूक एक तर्फी होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
तरीही अरविंद पाटलांची भूमिका काय? समजेना!
कोर्टात हार पत्करावी लागली तरी ‘मेरा बदला’ म्हणून माजी आमदार अरविंद पाटील यांची अद्याप तरी कोणतीच रणनीती वा हालचाल समजेनाशी झाली आहे. कालमणी, आमटेतील काहीं स्थानिक विरोधकांची हलचाल करायची इच्छा असली तरी त्यांना अरविंद पाटीलांच्या बळाशिवाय काहीच करता येईनासे झाले आहे. येत्या काहीं दिवसांत अरविंद पाटीलांच्या हलचाली दिसल्या तर या निवडणुकीत रंगत येईल, नाही तर पुन्हा कसर्लेकरच असेच गणित असेल….
एकूण 12 जागा, त्यापैकी 11 कर्जदार तर एकमेव बिनकर्जदार..
या कृषी पत्तीन संघात एकूण 12 जागा असून, त्यामध्ये 11 कर्जदार तर एकमेव बिनकर्जदार जागा आहे, त्यामध्ये सामान्य, मागासवर्गीय अशा वाटून देण्यात आल्या आहेत…

संपादक : विलास गोविंद कवठणकर





