उद्योगराजकीय

अरविंद पाटील: -निमित्त वाढदिवसाचे; पण, त्यामागे तालुक्याचे राजकीय गणित ?


विजयेंद्र युडीयुरप्पा वाढदिवसानिमित्त बंगळूरमध्ये भेट घेऊन पुष्पगुच्छ देत जोरदार अभिनंदन! 

 

–राजकीय न्यूज – 

बंगळूर/ खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर) 

जसजशा जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका जवळ येतील तसतसे राजकीय फड अधिक रांगतांना दिसत आहेत, आधीच तालुका भाजपमध्ये तीन गट पडल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या समर्थक गटाला अडचणीत आणण्यासाठी इतर दोन्हीं गट छुप्या मार्गाने सुरंग लावण्याच्या तयारीत असल्याचेही काहीं नेत्यांच्या ऍक्शनवरून दिसत असतांनाच आज  आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी आज राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र युडीयुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त बंगळूर येथे भेट घेऊन भले मोठे पुष्पगुच्छ देऊन जोरदार अभिनंदन केले. यावरून तालुक्यातील राजकारणात विशेषकरून तालुका भाजपमध्ये नक्कीच जोरदार गुप्तगू रंगल्याशिवाय राहणारच नाही.  तालुक्यात पक्का राजकारणी आणि कसलेला पैलवान म्हणून अरविंद पाटील यांच्याकडे पाहिले जाते, ऐन निवडणुकांच्या तोंडावर प्रदेशाध्यक्षांनी भेट राजकीय गणित जुळवजुळवीची ठरू नये म्हणजे झाले. कारण, केंव्हा कोणते पत्ते टाकणे हे पाटील यांच्याशिवाय कोणी जाणू नये म्हणजे झाले. तसाच राजकीय अर्थ काढला जाऊ लागला आहे. या भेटीने तालुका भाजपच्या राजकारणात बराच बद्दल आणि इफेक्टही जाणवू शकतो हेही नाकारणे चुकीचे ठरू नव्हे म्हणजे झाले!

 

आपल्या समर्थकांना तिकीट मिळवून देण्यासाठी एकही संधी सोडणे अरविंद पाटील यांच्यासाठी नडीचे ठरू नव्हे?

सध्या तालुक्यात अरविंद पाटील यांच्या बरोबर समितीतून भाजपमध्ये गेलेला समितीतील गट आणि मुळता भाजमधील काहीं जण अरविंद पाटील यांच्या पाठीशी असून, यातील दोघेही गुडघ्याला बाशिंग बांधून राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत, यातील काहीं जण तर दिवसागणिक आपल्या उमेदवारीचे टक्केच टक्के वाढवत चालले आहे, त्यामुळे अरविंद पाटील यांचे पत्ते कसे पडतील त्यावर यांचे भविष्य अवलंबून असेल! त्यामुळे आजची राज्य भाजप अध्यक्षांच्या भेटीनंतर राजकीय चक्रे जोरदार फिरणार यात तिळमात्र शंका नाही.

 

ढीगभर समर्थक इच्छुक; कोणत्या डोक्यावर अरविंद पाटलांचा हात पडणार?

भाजपमधूनच पण, अरविंद पाटील कट्टर समर्थक म्हणून ढीगभर इच्छुकांची जिल्हा आणि तालुका पंचायतीसाठी रांग लागली आहे. त्यात काहीं जण तर ‘मीच ‘ च्या प्रेमात बुडून गेल्याचे दिसत आहेत, अशांना पाटील साहेब तिकीट आशीर्वाद देण्यात यशस्वी होणार का?  यातील काहींना उमेदवारी नाही मिळाली तर त्यांच्या चांगलेच जिव्हारी लागू शकते? असेच राजकीय चित्र सध्या दिसू लागले आहे..

 

यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर यांची रणनीती काय असेल?

माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हालचालींवर विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासह सर्वच भाजप नेते आणि कार्यकर्त्यांची बारीक नजर लागून आहे. त्यामुळे काही दिवसातच अरविंद पाटील यांच्या राज्य भाजप अध्यक्ष भेटीचे रहस्य उलगडेल! त्यानंतर विद्यमान आमदार विठ्ठल हलगेकर यांनी कोणती रणनीती आखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल…

 

 

 

 

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *