राजकीय

आमका दिपक कवठणकर’च व्हया; पारवाड – कणकुंबीतील नागरिकांचे मत!


काँग्रेस संभाव्य उमेदवार दीपक कवठणकर यांची माहिती; जांबोटी भागातील नागरिकांच्या भेटी -गाठीत चांगला प्रतिसाद!

 

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

आमचो कसलाही काम जावूक बिगीन धावून येणारा कार्यकर्ता म्हणजे दिपक कवठणकर असा! म्हणून आमका तोच व्हया अश्या प्रतिक्रिया पारवाड – कणकुंबी भागातील नागरिकांनी भेटी – गाठी दरम्यान व्यक्त केल्याची माहिती जांबोटीसाठी काँग्रेसमधून जिल्हा पंचायतसाठी इच्छुक असणारे संभाव्य उमेदवार दीपक कवठणकर यांनी लोकहित न्यूज च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. या भागात राष्ट्रीय काँग्रेसचे वारे जोरात वाहू लागले असून, येथून आम्हाला ‘लीड’ मिळणार असल्याचेही कवठणकर यांनी स्पष्ट केले.

जांबोटीसह बैलुर, आमटे, कणकुंबी , पारवाड भागातील मतदारांच्या भेटीला सुरवात केली असून, त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, यावेळी जनतेला नविन आणि तरुण चेहरा हवा आहे अशाही भूमिका प्रत्येक गावातून मांडल्या जावू लागल्या आहेत.

 

आमच्या सरकारच्या पंचहमी योजनांचा फायदा होणार…

सामान्य नागरिकांचे सरकार म्हणुन काँग्रेस सरकारचा ओळख आहे, गेल्या तीन वर्षांपासून राज्यात सत्तेत असणाऱ्या आमच्या सरकारने पंचहमी योजनांमुळे महिलांसह नागरिक चांगलेच प्रभावित झाले असून, त्यांचा आमच्या पक्षाकडे मोठा कौल आहे. त्यामुळे डिसेंबर जानेवारी दरम्यान होवू घातलेल्या जिल्हा आणि तालुका पंचायत इलेक्शनात आमची बाजू भक्कम असेल यात तिळमात्र शंका नाही, निवडणुकीआधी आम्हीं दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. शक्ती योजना, गृहलक्ष्मी, गृहज्योतीसारख्या उत्तम योजना आम्हीं नागरिकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी झालो आहोत, आमच्या तालुक्याच्या नेत्या अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव तथा माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर, तालुका काँग्रेस कमिटी विशेषकरून तालुका ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष, काँग्रेस नेते सुरेश जाधव, सर्व कार्यकर्त्यांचे सामान्य जनतेच्या अडचणी, विकासासाठी अविरतपणे प्रयत्न सुरू असतात, त्यामुळे तालुक्यातील जनता आमच्या पाठीवर असल्याचेही दिपक कवठणकर यांनी पुढे बोलतांना सांगितले. त्यामुळे दिपक यांच्या दाव्याने राजकीय गुंता आणखी घट्ट होणार की काय? असेच चित्र दिसू लागले आहे.


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *