लाईट शॉर्ट सर्किट; 48 एक्करातील ऊस जळून खाक!
गणेबैल – 25 , रामगूरवाडी 8 तर कान्सुलीत 15 एकरातील ऊस जळून खाक; हेस्कॉम – कृषी खात्याने भरपाई द्यावी, कारखान्यांनी लवकरात लवकर ऊसाची उचल करावी!
खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
दरवर्षी खानापूरच्या अनेक भागात लाईट तारांचे शॉर्ट सर्किटचे प्रकार थांबण्याचे नाव घेईनात, आज (26) गणेबैल गावात 25 , कान्सुलीत 15 तर रामगुरवाडी गावात 8 एकरातील ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाला आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी आर्थिक अडचणीत आले असून, हेस्कॉम आणि कृषी खात्याने या घटनेचा पंचनामा करून भरपाई मिळवून द्यावी तर कारखान्यांनी अशा ऊसाची उचल आगाऊ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. आधीच ऊस दराचा तिढा सुटेनासा झाला आहे, त्यात असलेल्याही पिकाची पिकाची जळून नुकसान झाली आहे. या भागातील विजेच्या तारा ढिल्या पडल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत, याची हेकॉमने खबरदारी घेण्याची गरज आहे
शॉर्ट सर्किट होण्याची कारणे कोणती?
थेट संपर्क: जेव्हा पॉवर असलेला फेज (Live) वायर आणि न्यूट्रल (Neutral) वायर किंवा अर्थिंग वायर कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट एकमेकांच्या संपर्कात येतात।
• रोध (Resistance) कमी होणे: वायर एकमेकांना टेकल्यामुळे त्या मार्गाचा रोध अचानक जवळजवळ शून्य होतो।
• प्रवाह वाढणे: ओमच्या नियमानुसार (Ohm’s Law), रोध कमी झाल्यामुळे विद्युत प्रवाहात प्रचंड वाढ होते आणि अती प्रमाणात वीज एकाच क्षणी वाहू लागते।
• उष्णता आणि आग: जास्त करंटमुळे तार वेगाने गरम होते, वायरवरील प्लास्टिकचे इन्सुलेशन (Insulation) विरघळते किंवा जळते, आणि चिंगारी (Sparking) उडून आग लागण्याचा धोका निर्माण होतो।
शॉर्ट सर्किट होण्याची प्रमुख कारणे
• इन्सुलेशन खराब होणे: जुनी, जीर्ण किंवा उंदरांनी कुडतडलेली वायर।
• ओलावा किंवा पाणी: वायर किंवा स्विचबोर्डमध्ये पाणी किंवा ओलावा गेल्याने विजेला वाहण्याचा सोपा मार्ग मिळतो।
• ओव्हरलोडिंग: एकाच एक्सटेंशन बोर्डवर किंवा सॉकेटवर हीटर, इस्त्री, फ्रीज अशी जास्त वीज खाणारी उपकरणे एकाच वेळी चालवणे।
• चुकीचे किंवा सैल कनेक्शन: ढिली जोडणी किंवा निकृष्ट दर्जाची वायरिंग वापरणे।

संपादक : विलास गोविंद कवठणकर






