उद्योगराजकीय

बॉक्साइट माफियांचा हब्बनहट्टी आणि गावावर ‘कब्जा’ ; बॉक्साइट ट्रक अडकल्याने रस्ताच बंद!


रस्त्यावरच बॉक्साइट ट्रक अडकल्याने रस्ताच बंद; बससेवा खोळंबली विद्यार्थी वृद्ध प्रवाशांचे हालच हाल ; एका व्यक्ती’च्या भरतीसाठी गावावरच कब्जा, या नागरिक’च राहतात की, आणखी कोण? 

 

विलास कवठणकर: लोकहित न्यूज (हब्बनहट्टी)

कुठे तरी ऐकलं होतं की, खानापूर तालुक्याचा निसर्ग समृद्ध भाग विकायला काढलाय, त्याची सुरुवात हब्बनहट्टीसारख्या छोट्याशा खेड्यापासून झाली आहे. श्री स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रामुळे प्रसिद्ध असलेल्या या गावावर लेट्रॉईट’च्या नावाखाली बॉक्साइट माफियांनी कब्जा मारला असून, एका व्यक्तीसाठी संपूर्ण गाव आणि भागालाच जणु भीतीच्या वातावरणाखाली ठेवल्याचे चित्र आहे, आणि म्हणूनच कोणी याविरोधात आवाज उठवत नाहीत, कोणी उठवलाच तर त्याला बॉक्साइट माफियांकडून दादागिरी दाखवून थंड केले जाते, हब्बनहट्टी गावातील एका मागास व्यक्तीने कोर्टात जाण्याची तयारी केली तर त्या व्यक्तीला दाबण्यात आले. तब्बल पन्नास टनाहून अधिक वजनाचे मोठमोठे ट्रक हब्बनहट्टी रस्त्याने जात असून, रस्त्याचा तर बुकनाच उडालाय त्यात आता गाड्यांमधून येणारी ‘धूळ ‘ लोकांच्या घरात तोंडा -मासात जावून धुळीच्या प्रदूषणामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पण, तरीही प्रश्न असा पडतो की, हब्बनहट्टी गावात नेमके लोक’च राहतात की? आणखी कोण! एका व्यक्तीची गावावर इतकी ‘दहशत ‘ याविरोधात आवाज उठवण्याची कोणाचीही पॉवर नाही, गावात कोणी गंड पुरुष राहतात की नाही! असा प्रश्न भागातून विचारला जात आहे.

 

रस्त्यावर बॉक्साइट ट्रक अडकुन; इतर वाहतुकीची तीनतेरा, बससेवा खोळंबली, शाळकरी विद्यार्थी वृद्ध प्रवाशांचे हालच हाल,; यांना जाब विचारण्याची कोणाचीच धमक नाही का?

पब्लिक रस्ता अती वजनाच्या बॉक्साइट ट्रक’मुळे गोकरा होऊन गेलाय, कोणत्याही क्षणी हे मोठे ट्रक वाटेतच अडकून बसत असल्यामुळे इतर वाहतूक बंद पडते, आता तर या ट्रकमधून येणारी धूळ गावकऱ्यांच्या जीवावर उठली आहे, तर या रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे असे असताना हब्बनहट्टीसह देवाचीहट्टी, बैलूर, भागातील शेकडो लोक या रस्त्याने ये -जा करत असतात, त्यात पांढरे कपडेवाल्या पुढाऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात भाग असतो, तरीही याविरोधात आवाज उठविण्याची कोणाची धमक होईना , बहुतेक यामध्ये कुणीच ‘गंड ‘पुरुष नसावा अशी शंका येते…. सरकारी ऑफिसर हप्त्यांनी माजलेले आहेत, तर मग सामान्य जनतेने करावे तरी काय?….


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *