उद्योगसामाजिक

कसर्लेकर ग्रुप लागला कामाला! बेळगावच्या संचालकाची भेट घेतला; खानापूर’च्याही संचालकांना भेटा, ‘पत्त’ वाढ प्रश्न सुटेल!


शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा; कालच आमटे कृषी संचालक पदासाठी बिनविरोध निवड अन् आज बेळगांव डीसीसी बँक संचालक तथा विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची त्यांच्या स्वगृही नूतन संचालक मंडळाने घेऊन विविध विषयांवर चर्चा, अशीच भेट खानापूर डी सीसीसी बँक संचालक तथा माजी आमदार अरविंद पाटील यांचीही भेट घेतली तर ‘पत’ वाढ समस्या दूर होईल!

 

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

आज सकाळपासूनच मंगळवारच्या जांबोटीत एकच चर्चा रंगली होती, ती म्हणजे आमटे कृषी पत्तीन इलेक्शन! कोण कोण संचालक झाले, कोण कोणाविरुद्ध होते? दोन्हीं गटाचे किती किती संचालक झाले अशीच विचारणा एकमेकात चालल्याचे दिसून आले. अरेच्या ते एवढे विरोध राहून सत्तेसाठी एक झाले, अरे हे प्रकरण तर कोर्टात गेले होते की, मग लगेच ‘एकी ‘ झाली कशी? अशा विविध प्रकारच्या बातम्या काढल्या जात होत्या.तब्बल तीन महिने चाललेल्या आमटे कृषी पत्तीन’च्या राजकारणाला काल (दि.23) ‘ब्रेक’ लागला. काल (दि.23) सर्वच संचालकांची बिनविरोध निवड झाली, त्यानंतर लागलीच दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज (दि.24) लक्ष्मण कसर्लेकर ग्रुपने बेळगांव डीसीसी बँक संचालक तथा विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची सका -सकाळी भेट घेतली.

त्या भेटीत सदिच्छा आणि संघाच्या समस्यांची रूपरेषा आखलेल्या नूतन संचालकांच्या फोटो हलचालींवरुन दिसून आले, मग प्रश्न असा निर्माण झाला की, तर मग खानापूर डीसीसी बँक संचालक तथा माजी आमदार अरविंद पाटील यांचीही भेट घेणे अनिवार्य होते. दोन्हीं भेटींतून आमटे कृषी पत्तीन’साठी महत्वाच्या असणाऱ्या, पत’ वाढीच्या समस्येचे नक्कीच निरसन होईल, अशी दिलासादायक दिशा मिळू शकते, असेही भाकित मांडता येईल. बहुतेक त्याच मार्गाचा अवलंब लक्ष्मण कसर्लेकर ग्रुपने अवलंबला असावा, म्हणूनच आजची भेट – जणू ग्रेट भेट ठरावी, अशीच शेतकऱ्यांची प्रामाणिक आशा!

 

अरविंद  पाटील ग्रुपच्या नूतन संचालकांमुळे डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील यांच्याकडील कृषी पत्तीन संघाची कामे सोप्यात होणार!

आज लक्ष्मण कसर्लेकर यांच्यासह त्याच्या नूतन संचालकांनी बेळगांव डीसीसी बँक संचालक तथा विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांची भेट घेतली, त्या भेटीत काहीना काही तरी संघाला नवीन दिशा मिळालीच असणार! आता यावेळी अरविंद पाटीलांच्या गटातून निवड झालेल्या दोन नूतन संचालकांमुळे विद्यमान तालुका डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील यांच्याकडून कृषी पत्तीन संघाची कामे करणे नक्कीच सोपे जाईल, यावेळी कोणाकडे बोट दाखवावे लागेल असे वाटत नाही.. नव्याने शेअर्स करणे किंवा आणखी काही बदल करणे सारखी कामे अगदी सोप्यात होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे… पण, बघू तोपर्यंत वेट अँड वॉच…

 

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *