सत्ताधारी -विरोधक ‘मनोमिलन’ मोठे फोटोप्रदर्शन झाले खरे! पण, यापुढे तरी ‘पत्त’ वाढीचा ‘वनवास’ सुटणार काय?
शेतकऱ्यांचा सत्ताधारी आणि विरोधकांना खडा प्रश्न; गेली ददहा वर्षे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर आणि डीसीसी बँक संचालक तथा माजी आमदार अरविंद पाटील यांच्या’तील निकू -मीखुल्या ‘ मुळे वाढीव ‘पत्त’पासून निष्पाप शेतकऱ्यांचा विनाकारण डबरा काढला जातोय, यापुढे मात्र, शेतकरी आक्रमक होण्याचे चिन्हं…
आमटे: लोकहित न्यूज
–बाजू खरी आणि खोटी-
आधी विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर आणि डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील यांच्या ‘निकू – मिखुल्याखोर’ यारी दोस्तांच्या अती प्रेमामुळे गेली दहा वर्षे आमटे, कालमणी,तोराळी, देवाचीहट्टी हब्बनहट्टी गावच्या भोळ्या -भाबड्या निष्पाप शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही, ‘पत्त’ वाढीचा विषय आला की, हे दोघेही एकमेकाकडे बोट दाखवून वेळ मारून नेताहेत, हीच निवडणूक आली की, मात्र, यांच्या छुप्या बैठका, भेटी कोणत्या वेळी होतील, रात्री होतील किंवा मध्यरात्री होतील याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही, गेल्या दहा वर्षांत हेच दोन अंकी नाटक पाहून शेतकऱ्यांचे डोळे पांढरे झाले आहेत! कालच पार पडलेल्या बिनविरोध निवडणुकीत बरेच छक्के -पंजे खेळून अखेर सत्ताधारी आणि विरोधकांच्या मनोमिलनाचा, शक्तीप्रदर्शनाचा भला मोठा फोटो तालुकाभर झळकला अन् शेतकऱ्यांना कुठे तरी मोकळे झाल्यासारखे वाटते आहे, म्हणूनच शेतकऱ्यांतून एकच वाक्य बाहेर येत आहे, ते म्हणजे तुमची दोस्ती आमच्यापासून लपून राहूच शकत नाही, तुमची मनोमिलन हौस पुरी झाली असेल तर यापुढे तरी आम्हाला वाढीव ‘पत्त ‘ देऊन आमचा दहा वर्षांचा वनवास सोडवा! एवढीच आमची इच्छा! कारण, तुम्हीं दोघेही आमच्यात भांडणे लावून तुमची राजकिय पोळी भाजून घेतला, तुमचे मन भरले, म्हणूनच आम्हाला वाढीव ‘ पत्त ‘ देऊन आमच्यावर उपकार करा सत्ताधारी+ विरोधीहो! –
–आपला विश्वासू भोळा भाबडा शेतकरी!
तीन महिने कोर्टात कुस्ती अन् निवडणुकीत मात्र, चांगलीच दोस्ती, क्या बात है !
गेले दोन – तीन महिने कोर्टात , माझे मतदार की, तुझे मतदार असा शेतकऱ्यांचा ‘फुटबॉल ‘ खेळ सत्ताधारी आणि विरोधकांत चालला, यात सत्ताधारी जिंकले असले तरी, याचा शेवटी निकाल काय? लागला ‘हम सब एक है! आणि हिकडे हेच शेतकरी आमचा गट आमचा नेता म्हणून अजूनही वाटेतच, पण त्यांना काय माहित याच वाटातून आमची वाट लागते आहे, ते! आणि तेच झाले असो,
आम्हांला कळले आहे आता, तुम्हीं दोघांनीही खुर्चीसाठी जरूर राजकारण करा! पण, आम्हांला सोयी -सवलती देऊन! एवढेच….

संपादक : विलास गोविंद कवठणकर





