राजकीय

ZP,TP साठी इच्छुकांची प्रतीक्षा संपली ; जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू झाली!


16 नोव्हेंबरपूर्वी राज्य निवडणूक आयोगाला अहवाल द्यावा लागणार; त्यानंतर लगेच निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार! 

 

बंगळूर/ बेळगांव: लोकहित न्यूज नेटवर्क 

गेल्या महिन्यापासून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत, मात्र, निवडणुकीची तारीख अथवा जिल्हा प्रशासनाची कोणतीच तयारी, हलचाली दिसत नव्हत्या. दोन दिवसांपूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकीची तयारी करून घ्या, असे आदेश बजावल्याने जिल्हा प्रशासन जोरदारपणे कामाला लागले असून, सर्व यंत्रणा, मनुष्यबळसारख्या व्यवस्थांची जुळवाजुवळ सुरू झाली आहे. या महिन्याच्या 16 नोव्हेंबरपूर्वी तयारीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार आहे. त्यानंतर लगेचच निवडणुकीच्या तारखा, निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे.

 

प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात तालुका अधिकाऱ्यांची नेमणूक…

   जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा आणि संबंधित तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रेड टू, उपतहसीलदार, सर्कल व त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांची तसेच तालुक्यातील इतर खात्यातील अधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी निवड करण्यात येणार आहे, निवडणूक बूथ आणि जिल्हा आणि तालुका पंचायत मतदारसंघात लागणाऱ्या यंत्रणा कार्यरत राहणार आहेत. त्यांच्यामार्फतच प्रक्रिया पार पडेल, त्या सर्व व्यवस्थापनाचा अहवाल आठवडाभरात निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे.

 


लोकहित न्यूज

संपादक : विलास गोविंद कवठणकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *