विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या घरी ‘दिवाळी’; एआयसीसी सचिव, खानापुरच्या मा.आ.डॉ.अंजली निंबाळकर यांच्याकडून शुभेच्छा!
देशातील बड्या नेत्यांमध्ये डॉ. निंबाळकर यांना विशेष अमंत्रण!
दिल्ली/ खानापूर लोकहित न्यूज (विलास कवठणकर)
केंद्र सरकारमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या दिल्लीतील स्वगृही दिवाळी उत्सव आयोजित केला. त्यानिमित्त देशभरातील पक्षातील महत्वाच्या नेते, पदाधिकारी मंडळींना राहुल गांधी यांनी अमंत्रित केले होते, त्यामध्ये एआयसीसी सचिव तसेच खानापूरच्या माजी आमदार डॉ अंजली निंबाळकर यांचाही समावेश होता. त्यामुळे कालच दिल्लीला रवाना झालेल्या डॉ. निंबाळकर यांनी राहुल गांधी यांची आज भेट घेऊन खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ अंजली निंबाळकर यांनी देशभरातील काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन, विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा तथा वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचीही डॉ.निंबाळकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. 

संपादक : विलास गोविंद कवठणकर





