द- ग्रेट देवाचीहट्टी! 14 मतांची पॉवर; दोन संचालक आमटे कृषी पत्तीन’च्या अधिकारा’वर!
अजब…पॉवर ऑफ द पॉलिटिक्स गेम: खानापूर तर सोडाच जिल्ह्यात पहिला योगायोग, जिथे शंभरहून अधिक मते असतानाही दोन संचालक मिळत नाहीत…. अन् त्याला अपवाद ठरत, देवाचीहट्टी’ने हा विक्रम मोडीत काढला….
आमटे कृषी पत्तीन संघ…. विशेष वृत्त ..
-विलास कवठणकर
तीस वर्षांपूर्वी पूर्वी बळकटीने पंचायत असेल किंवा एखाद्या सहकारी संस्थांवर एखाद्या प्रभावी व्यक्तीची निवड केली जायची, कारण त्यावेळी या पदांना आताइतके महत्व नव्हते! पण, प्रसिध्दी आणि झटापट श्रीमंतीच्या नादात अशी क्षेत्र म्हणजे जणू एक ‘नादच’ बनला आहे. पण, सध्या कोणतेही पद मिळवण्यासाठी जीवाचे राजकीय ‘वजन रान ‘ करावे लागते, तेही कुठे तरी अरविंद साहेब, हलगेकर सर आणि आणखी कोणी तालुका वजनदार नेते आशीर्वाद देतात तेंव्हा ! तरीही स्वतः चे आडवे उभे डोके खर्ची घालावे लागते हेही खरे… दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या आमटे कृषी पत्तीन संघाच्या संचालक मंडळ निवडणुकीत तालुक्यातच अजब योगायोग जुळून आला आहे, तो म्हणजे फक्तच 14 मते असतानाही तब्बल दोन संचालक पदरात पाडून घेण्याची किमया देवाचीहट्टी’ने साधली आहे, व्यक्ती पाहून ही पदे मिळाली असली तरी गावचे नाव पुढे घ्यावेच लागते हेही तितकेच खरे! कृषी पत्तीनसह सहकार क्षेत्रातील कसलेला पैलवान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यमान अध्यक्ष लक्ष्मण कसर्लेकर यांच्याकडून ही पदे काढून घेतल्या प्रमाणे घडले असे म्हटले तरी वावगे ठरू नये! त्यातील एक पद कसर्लेकर यांच्या मर्जीतील असले तरी, एक पद राजकीय डावामुळे द्यावे लागले हे मात्र, नक्कीच मानावे लागेल! दुसरीकडे देवाचीहट्टी गावच्या पूर्वेकडील नाल्याच्या पलिकडील देवाचीहट्टीतील अधिक जमीनदार बैलुर हद्दीत येत असल्याने बैलुर कृषीपत्तीन संघामध्ये आमटेहून अधिक मते आहेत, तर त्याठिकाणी राजकीय उलथापालथ करून कधी काळी संचालक पद गळ्यात पडले असेल, पण, तेच हिकडे आमटे कृषी पत्तीनमध्ये दोन -दोन संचालक पदे मिळतात, त्यामुळे कशे का? असेना देवाचीहट्टी’सारख्या छोट्याशा गावाला आणि तेही अवघी 14 मते असताना दोन दोन संचालक पदे मिळतात म्हणजेच द -ग्रेट देवाचीहट्टी म्हणावे लागेल… यालाच म्हणतात राजकीय गरज… आणि याला आणि त्याला अडका अडकी… पण त्याला पुढील राजकीय दिशा आणि दशा पाहूनच हे चित्र राजकीय नेते मुद्दामहून घडवून आणतात, तेही तितकेच खरे मानावे लागेल….

संपादक : विलास गोविंद कवठणकर





